Published On : Sun, Sep 29th, 2019

भव्य कलश व कावड यात्रेने नवरात्री महोत्सवाची सुरूवात

कन्हान : – सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान व्दारे पारंपरिक पध्दतीने भव्य कलश व कावड यात्राने कन्हान नदीचे पावन जलआणुन मॉ दुर्गा मंदीरात महादेवीचे जलाभिषेक करुन घटस्थापना सह नवरात्र महोत्सवाची थाटात सुरूवात करण्यात आली.

रविवार दिनांक २९/०९/२०१९ ला सकाळी ११ वाजता बीकेसीपी शाळेच्या जवळील कन्हान नदीचे पुजन करून २०१ कलशा मध्ये पावन जल घेऊन कलशधारी नवकन्या, महिला व कावड धारी पुरूष भाविक भक्तासह मातेचे नवरूप असलेल्या गाडी, घोडे, डि जे , बँड वाजा, महिला व पुरूष भजन मंडळी मातेच्या जयघोषात भव्य कलश, कावड पदयात्रा पारंपरिक पध्दतीने काढुन महामार्गानी गांधी चौक, नगर परिषद चौक, आंबेडकर चौक, शिवाजी नगर चौक, धरम नगर मार्गे पिपरी येथील नवदुर्गा मंदीरात दुपारी २ वाजता पोहचु न मॉ दुर्गा मातेचे कन्हान नदीच्या पावन कलशाच्या जलाने मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक, विधीवत पुजा अर्चनासह घटस्थापना व आरती करून सार्वजनिक नवदुर्गा महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, आमदार डी एम रेड्डी, विजय हटवार, केशरीचंद खंगारे, प्रशांत मसार, किशोर बेलसरे, शरद डोणेकर, मोतीराम रहाटे, मनोहर पाठक, गेंदलाल काठोके, मनोज कुरडकर, अजय लोंढे, सेवकराम बिलोणे, निलकंठ कुरडकर, राजेश यादव, अमोल साकोरे, अँड आशाताई पनीकर, करूणा आष्टणकर सह परिसरातील मान्यवरासह मोठय़ा संख्येने महिला पुरूष भाविक भक्त उपस्थित होते.

Gold Rate
17 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,31,400 /-
Gold 22 KT ₹ 1,22,200 /-
Silver/Kg ₹ 1,79,500/-
Platinum ₹ 52,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नऊ दिवस दररोज सायंकाळी ७ वाजता महाआरती व विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासह शनिवार दि.५ ऑक्टोबर ला ७. ३० वाजता इंडियन आयडल फेम, सिने गायक सोनु निगम सोबत गायन करणारे सहगायक अभि जीत कडु यांचा भव्य दिव्य लोक कला गिताचा ऑर्केस्ट्रा आयोजित केला आहे. सोमवार दि ७ ऑक्टोबर ला सायंकाळी ५ वाजता पासुन महाप्रसाद वितरण आणि दि.८ ऑक्टोबर ला सकाळी १० वाजता पिपरी च्या कन्हान नदीत घट विसर्जन करून सायंकाळी ७ वाजता दुर्गा माता चौक पिपरी येथे रावन दहन करून नवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात येईल.

सार्वजनिक नवरात्र महोत्सवाच्या यशस्वीते करिता सार्वजनिक नव दुर्गा उत्सव मंडळ पिपरी-कन्हान चे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव, केशरीचंद खंगारे, राधेशाम भोयर, प्रशांत बाजीराव मसार, भोला भोयर, संजय चतुर, गुड्डू यादव, राजु कुर्वे, गौरव भोयर, अजाब राव कडनायके, प्रकाश डांगे, मुरलीधर नान्होटे, निलकंठ कुरडकर, दिपक तिवाडे, प्रताप तिलीखेडे, कुंदन रामगुंडे, आकाश खडसे, फजित खंगारे, आकाश भगत, अमोल भोयर, सचिन खंगारे, हर्षल तिवाडे, श्रावण खंडाते , रवि यादव, सोनु कुरडकर, गोपाल मसार, दिनेश ठाकरे, विनोद येलमुले, संदीप भोस्कर, पकंज खंगारे, विक्रम तिवाडे, बंटी ढोले, पकंज हांडे, उज्वल येलमुले, साहील चौधरी, कुणाल आगुटलेवार सहीत परिसरातील भाविक मंडळी परिश्रम घेत आहेत.

Advertisement
Advertisement