Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jun 19th, 2019

  नवोदय अर्बन कॉपरेटिव बैंक घोटाळ्यात दोन आरोपी अटकते, आरोपींना पाच दिवसाची पोलिस कोठड़ी सुनवन्यात आली

  नागपूर : बहुचर्चित नवोदय अर्बन को-ऑप बँके ली. घोटाळ्यातील २ आरोपींना अटक करण्यात आली व त्यांना ५ दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

  अशोक धवड अध्यक्ष असलेल्या वरील बँकेत ३८करोड ७५ लाख रुपयांचे घोटाळे उघडकीला आले असून आज या प्रकरणात २ आरोपी जे सदर बँकेत मॅनेजर होते अटक करण्यात आली, व त्यांना विषेश न्यायाधीश श्री पाटील यांचे न्यायालयात हजर करण्यात आले होते, व त्यांच्या १० दिवसांच्या पोलीस कोठडी ची मागणी करण्यात आली होती,

  प्रमुख जिल्हा सरकारी वकील श्री नितीन तेलगोटे यांनी शासनातर्फे बाजू मांडून आरोपींची पोलीस कोठडी पुढील तपासासाठी खूप आवश्यक आहे , इतर आरोपींना अटक करणे आहे व या आरोपींकडून गुन्हा संबंधित बऱ्याच गोष्टी उघडकीस आणावयाचे आहे असे न्यायालायच्या निदर्शनास आणून दिले, आरोपी च्या वकिलांनी पोलीस कोठडीस विरोध केला, शेवटी न्यायालायाने आरोपींना ५ दिवसांची कोठडी सुनाविली,

  प्रमुख जिल्हा सरकारी वकील श्री नितीन तेलगोटे यांनी शासनातर्फे बाजू मांडली, आरोपी तर्फे ऍड आर बी गायकवाड, व ऍड देशराज यांनी बाजू मांडली,ह्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक फुलपगारे करीत आहेत…


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145