Published On : Wed, Sep 12th, 2018

शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची लोकप्रियता ढळली – नवाब मलिक

Nawab Malik

मुंबई : शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची देशातील लोकप्रियता ढळू लागली असल्याचे संकेत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला

मोदींचा लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा आदेश शाळांना सरकारने काढला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना दिली.

महाराष्ट्र सरकारने प्रत्येक शाळांमध्ये मोदी यांचा लघुपट दाखवण्याचा आदेश काढला आहे हे चुकीचे आहे. सरकारी शाळांच्या साहित्यांचा गैरवापर करुन भाजप यातून आपला प्रचार करणार आहे. मुलांना लघुपट दाखवणे आणि तेसुध्दा जबरदस्तीने दाखवणे म्हणजे कुठे ना कुठे मोदींची लोकप्रियता देशात कमी होत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

भाजप प्रचारासाठी शाळांचा वापर करत आहे हे योग्य नाही. शिक्षकांनी आणि शाळा चालवणाऱ्या संस्थांनी सरकारच्या या मनमानी आदेशाला आणि त्यांच्या दबावाला बळी न पडता अशा बेकायदेशीर आदेशांना विरोध करावा असे आवाहन राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.