Published On : Wed, May 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद; ऑनलाइन औषधविक्रीविरोधात आंदोलन, FDA अलर्ट मोडवर

Advertisement

मुंबई : ऑनलाइन औषध विक्री आणि ई-फार्मसी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींच्या विरोधात ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स’ (AIOCD) संघटनेने आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे बुधवारी देशभरातील बहुतांश वैद्यकीय दुकाने बंद राहण्याची शक्यता असून, मुंबई महानगर प्रदेशासह अनेक शहरांमध्ये या बंदचा मोठा परिणाम जाणवणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई परिसरातील सुमारे 7 ते 8 हजार वैद्यकीय दुकाने बंद राहू शकतात. तर देशभरातील तब्बल 12.5 लाखांहून अधिक औषध विक्रेते आणि वितरक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Gold Rate
July 02 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,100 /-
Gold 22 KT ₹ 1,32,800 /-
Silver/Kg ₹ 2,30,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऑनलाइन फार्मसी कंपन्यांकडून नियमबाह्य पद्धतीने औषध विक्री होत असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची योग्य तपासणी न करता औषधे दिली जात असल्याने रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. तसेच ई-फार्मसी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या सवलतींमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आल्याचेही सांगितले जात आहे.

All India Organisation of Chemists and Druggists च्या आंदोलनाला पाठिंबा देताना Maharashtra State Chemists and Druggists Association चे सरचिटणीस अनिल नावंदर यांनी सांगितले की, ग्राहक ऑनलाइन औषध खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वळत असून याचा परिणाम छोट्या औषध दुकानांवर होत आहे. ऑनलाइन औषध विक्रीसाठी स्पष्ट कायदा नसतानाही काही कंपन्या मसुदा अधिसूचनेचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Advertisement

दरम्यान, नागरिकांना औषधांचा तुटवडा जाणवू नये यासाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाले आहे. रुग्णालयांशी संलग्न असलेली औषध दुकाने, 24 तास सुरू असलेली मेडिकल्स आणि निवडक औषधालयांमार्फत अत्यावश्यक औषधांची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई FDA कडून विविध विभागांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन औषधांचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच, रुग्णांना त्रास देणे हा आंदोलनाचा उद्देश नसून आपत्कालीन रुग्णांसाठी काही मेडिकल्स सुरू ठेवण्यात येणार असल्याचे औषध विक्रेत्यांच्या संघटनांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews

दुकान के बोर्ड को लेकर विवाद #nagpurnews #viral #vivad #crime #marpeet #latestnews

Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj Roshan

Nagpur’s Emerging Markets: Opportunities, Challenges & Future Growth | Interview with Pankaj...

इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews

इंस्टाग्राम फ्रेंडशिप बनी खूनी टकराव की वजह... #nagpurnews #crime #instagram #friendship #latestnews

कमाल चौक स्थित हैमर्स कैफे पर पांचपावली पुलिस का छापा #nagpurnews #hukka #parlour #crime #newsupdate

कमाल चौक स्थित हैमर्स कैफे पर पांचपावली पुलिस का छापा #nagpurnews #hukka...

₹50 के विवाद में खूनी हमला ! #nagpurnews #crime #murdernews #newsupdate

₹50 के विवाद में खूनी हमला ! #nagpurnews #crime #murdernews #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges