Published On : Mon, Jul 16th, 2018

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे नागपूरमध्ये उदया संविधान बचाव,देश बचाव आंदोलन…

नागपूर: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने दिल्ली,मुंबई आणि आता विदर्भातील नागपूरमध्ये संविधान बचाव,देश बचाव आंदोलनाचे आयोजन मंगळवार दिनांक १७ जुलै रोजी करण्यात आले आहे

या संविधान बचाव,देश बचाव आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

या आंदोलनाची सुरुवात राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतून अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईमध्ये आणि आता विदर्भातील नागपूर येथे हे संविधान बचाव,देश बचाव आंदोलन होत आहे. संविधान बचाव, देश बचाव आंदोलन नागपूरच्या देशपांडे सभागृहात उदया दुपारी १ वाजता होणार आहे.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षाचे सर्व आमदार आणि विदर्भातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्या मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.