Published On : Mon, Jul 16th, 2018

साटक ग्राम पंचायत व्दारे गुणवंताचा सत्कार

कन्हान : – ग्राम पंचायत साटक च्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभ मा. शरद डोणेकर उपाध्यक्ष जि.प.नागपुर यांच्या अध्यक्षेत सरपंच सिमाताई यशवंतराव उकुडे, उपसरपंच गजानन वाढंरे आदीच्या हस्ते गावातील १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थी प्रिती गेरवाल, सोनु भुते , प्रियंका लच्छोरे , प्रणाली बावनकर, पियुष लोळे , यामिनी हटवार, अश्विनी कंभाले यांचा सत्कार करून सत्कारमुतीॅ डाॅ प्रशांतजी श्रीखंडे, तसेच माजी सरपंच सुखराम रच्छोरे, बाबुराव वांढरे, रेखाताई हटवार, मनिराम वाडीभस्मे, राजु भुते, कमलचंद भुते आदींचा सुध्दा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रेमचंदजी चामट, आत्मारामजी उकुडे, रमेशजी वाढंरे, निकेश हारोडे, रविंद्र गुडधे, दिपक लाडगे, अमोल देशमुख, मगेश भुते व इतर मान्यवर आणि गावकरी प्रामुख्याने उपस्थितीत होते . कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता ग्राम पंचायत साटक सर्व सदस्य, कर्मचारी वृंद आणि गावक-यांनी सहकार्य केले .