Published On : Wed, Oct 31st, 2018

राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे ‘एकता दौडचे’ आयोजन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते शुभारंभ

नागपूर: 31 ऑक्‍टोबर 2018 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती उत्सवानिमित्त व राष्‍ट्रीय एकात्‍म्‍ता दिवसाप्रसंगी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे रामनगर, नागपूर येथे ‘एकता दौड’ चे आयोजन करण्‍यात आले होते.

Advertisement

या दौडचा शुभारंभ केंद्रीय रस्‍ते वाहतूक , महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.

यापूर्वी राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी यांनी नारंग टॉवर, सिवील लाइन्‍सस्थित कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांना ‘राष्‍ट्रीय एकात्‍मतेची’ शपथ दिली. या एकता दौडमध्‍ये राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement