Published On : Mon, Dec 24th, 2018

रामटेक येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

ग्राहकांनी जागरूक राहून व्यवहार करणे काळाची गरज

रामटेक : ग्राहकांची फसवणूकी चे प्रमाण वाढत असल्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहणे आज काळाची गरज असून जर ग्राहक नाडला जात असेल तर ग्राहकांना न्याय देण्या करीता शासन कटिबद्ध असल्याचे मत तहसील कार्यालयात संपन्न राष्ट्रीय ग्राहक दिन ह्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक चे अध्यक्ष उमाकांत मर्जिवे यांनी आपल्या भाषणात ‘”अतिविश्वास ,प्रलोभन हया बाबींच्या आहारी ग्राहकानी जाऊ नये .

ग्राहकावर अन्याय होउ नये यांकरीता ग्राहकानी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. ग्राहकांनी त्यांच्या हक्कासोबतच त्यांच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत याची देखील जाणीव ठेवावी.ग्राहकांनी बिलाशिवाय व्यवहार करू नये अन्यथा त्यांना कुठेही दाद मागता येत नाही . स्वतःवर व इतरांवर अन्याय होऊ नये ह्याकरिता ग्राहकांनी संघटीत होऊन ग्राहक हित जोपासण्याकरीता आवश्यक व्यवस्था निर्माण करावी तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘ग्राहक राजा’ ही म्हण सार्थ होईल. त्यामुळे ग्राहकांनी स्वतःच्या हक्काकरीता जागरूक राहने आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ह्यावेळी केले”.

नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांनी आपल्या भाषणात ” आपण दुकानातून एखादी वस्तु घेतली तर बील घेत नाही आपण वस्तु घेऊन निघून जातो ,नंतर ती वस्तु खराब निघाली आपण दूकान दार कडे जातो व ही वस्तु खराब आहे असे म्हणतो पण दुकानदार दुर्लक्ष करतो तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे आपल्याला समजते .म्हणून कोणत्याही वस्तु चे बील घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले .

अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक चे कार्याध्यक्ष राकेश मर्जीवे यांनी आपल्या भाषणात “ग्राहकांच्या तक्रारी ,समस्या प्रभावीपणे निवारण करण्या करीता स्वतंत्र ग्राहक मंत्रालय , प्रशासकिय सेवा , आय ए एस दर्जाचा अधिकारी असणारे आयुक्तालय , ग्राहक संरक्षण स्थापन करण्यात येणे आज काळाची गरज असून .तहसील कार्यालय येथे नियमित तक्रार निवारण सभा जर झाली तर ग्राहकांच्या समस्या मार्गी लागू शकतात असे मत ह्यावेळी व्यक्त केले .


ह्यावेळी तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी मासिक सभा घेण्याबाबत प्रतिसाद दिला.
.ह्यावेळी प्रामुख्याने अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी स्वप्नील पडोळे, नायब तहसीलदार एस. डी. पाटील,अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक चे अध्यक्ष उमाकांत मर्जीवे, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेकचे कार्याध्यक्ष राकेश मर्जीवे , प्रशांत येडके,अविनाश शेंडे,शेषराव बांते,पुरुषोत्तम मेश्राम ,रीना तायवाडे तसेच नागरिकांची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पुरवठा निरीक्षक अतिश जाधव यांनी केले.