Published On : Wed, Oct 9th, 2019

नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव सिवील सर्व्हन्टस्‌ तर्फे धम्मचक्र परिवर्तन दिनाप्रसंगी विविध उपक्रम संपन्न

नागपूर : 63 व्या धम्मचक्र परिवर्तन दिनाप्रसंगी नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव सिवील सर्व्हन्टस्‌ या संघटनेद्वारे नागपुरातील दीक्षाभूमी मध्ये माहितीपर स्टॉलच्या माध्यमातून सम्राट अशोक यांच्या बुद्धकालीन इतिहासाचा, संवैधानिक आरक्षणातील तरतुदींचा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ लिखाणाचा संदर्भात मुद्रीत तसेच ईलेक्ट्रोनिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले.

याप्रसंगी या स्टॉलला राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव डॉ. शाम तागडे तसेच राजेश ढाबरे(आय.आर. एस.) निखिल मेश्राम (आय.आर. एस.) यांनी भेट दिली .

Gold Rate
19 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,300 /-
Gold 22 KT ₹ 1,02,600 /-
Silver/Kg ₹ 1,29,600/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोग्रसिव सिवील सर्व्हन्टस्‌ (एन.ए.पी.सी.एस.) ही प्रगतीशील विचारांच्या अधिकाऱ्यांची एक संघटना असून या संघटनेमार्फत बुद्ध आणि आंबेडकरी अनुयायांना अंधश्रद्धेच्या व पाखंड यापासून मुक्तता देण्यासाठी परिवर्तनवादी साहित्याचे वितरण धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रामुख्याने वितरीत करण्यात येते . विद्यार्थ्यांना यु.पी.एस.सी. एम.पी.एस.सी. परिक्षांच्या संदर्भात मार्गदर्शनही यानिमित्ताने करण्यात येते.

दरवर्षी दीक्षाभूमी ते रेल्वे स्टेशन हे सुमारे 20 किमी चे अंतर अनुयायांना पायी कापावे लागते, ही गैरसोय टाळण्यासाठी संघटनेने दीक्षाभूमी ते रेल्वे स्थानक अशा मार्गावर ये-जा करण्यासाठी 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान 2 वाहनांची विशेष व निशुल्क: व्यवस्था केली होती, असे एन.ए.पी.सी.एस. चे संस्थापक सदस्य डॉ. किशोर मानकर यांनी सांगितले.

नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह असोसिएशनचे डॉ. किशोर मानकर (आय.एफ.एस.), संजय दहिवले(आय.एफ.एस.), मुकुल पाटील (आय.आर. एस.), उपसेन बोरकर(आय.आर. एस.), अमोल शेरखाने (आय.आर.एस.ई.ई.‌) यांनी व राज्यातील इतर सदस्यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Advertisement