Published On : Tue, May 18th, 2021

पथविक्रेत्यांवर होणार्‍या अन्यायाविरोधात नास्वीने सुरू केला हेल्पलाईन नंबर

दिल्ली : नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर्स ऑफ इंडियाने (नास्वी) पथविक्रेत्यांवरील पोलिसांच्या अमानुष वागणुकीच्या विरोधात एक वेबिनार आयोजित करून राष्ट्रीय स्तरावर एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला. कोविड १९ लॉकडाउन नंतर, रस्त्यावर विक्रेत्यांचा छळ आणि त्यांच्यावरील जुलूम आदी प्रकरणे अनेक पटींनी वाढली आहेत. पोलिस आणि उच्च अधिकाऱ्यांकडून होणार्‍या छळाबद्दल तक्रार करण्यास विक्रेते नेहमीच घाबरतात. मात्र आता पथविक्रेते या हेल्पलाइन क्रमांकावर आणि ई मेलद्वारे नास्वीकडे तक्रारी करुन त्यांच्या व्यथा मांडू शकतात असे मत नास्वीचे संस्थापक अरविंद सिंग यांनी मांडले.

नास्वीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्र प्रकाश सिंह यांनी वेबिनारमध्ये हेल्पलाइन नंबर लाँच केला व असे आश्वासन दिले की पथविक्रेत्यासोबत होणार्‍या गैरव्यवहारांच्या प्रकरणात नास्वी पथविक्रेत्यांना सर्व प्रकारे सहाय्य करेल.

Helpline no – 9835674364 Email – help@nasvinet.org


सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी वेबिनार मध्ये सुचविले कि पथविक्रेत्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पोलीस आयुक्त व पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून एक संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी.

या वेबिनार मध्ये पटना, दिल्ली व कर्नाटक येथील काही पथविक्रेत्यानी आपापलया समस्या व्यक्त केल्या व नास्वी कडून समस्या निवारणाची अपेक्षा केली. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि माजी आयएएस अधिकारी हर्ष मंदार यांनी विक्रेत्यांना “एक व्हा: आणि संघर्ष करा” असे आवाहन केले. दिल्लीचे माजी डी. सी. पी. आणि प्रयास या संस्थेचे संस्थापक आमोद कांत यांनी पथविक्रेत्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले. एफ.ई.एस. दिल्ली येथील दयामंती धारण यांनी हा संघर्ष बर्‍याच काळापासून चालत आलेला असून नास्वी नेहमीच त्याविरोधात लढा देत आली आहे, मात्र आता पथविक्रेत्यांना न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. झूम आणि फेस बुकच्या माध्यमातून झालेल्या या वेबिनारमध्ये देशभरातील स्ट्रीट विक्रेत्यांच्या ४०० हून अधिक नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

Link to the webinar – https://fb.watch/5vi1-i9luO/