Published On : Thu, Aug 1st, 2019

राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी नासुप्र’ने हटविले अतिक्रमण

नागपूर: मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक २/२०१८ च्या निर्णयानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०७ च्या रुंदीकरणा करिता पिवळी नदी लगत असलेल्या खसरा क्रमांक ४७, मौजा वांजरा येथे नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील अनाधिकृत अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही आज बुधवार, दिनांक ३१/०७/२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यास व राष्ट्रीय महामार्गतर्फे संयुक्तरित्या करण्यात आली.

यावेळी नासुप्रतर्फे कार्यकारी अभियंता श्री. डी आर गोर, विभागीय अधिकारी श्री. पंकज आंभोरकर, क्षतिपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील तसेच जरीपटका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement