Published On : Fri, Dec 27th, 2019

परिवहन समिती सभापतीपदी नरेंद्र बोरकर तर कर आकारणी समिती सभापतीपदी महेंद्र धनविजय यांची अविरोध निवड

Advertisement

नागपूर. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदी नरेंद्र (बाल्या)बोरकर यांची तर कर आकारणी समिती सभापतीपदी महेंद्र धनविजय यांची अविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी (ता.27)ला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रीया पार पडली.

मावळते परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी राजीनामा दिल्याने परिवहन समिती सभापतीपदी नरेंद्र बाल्या बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली. परिवहन समिती सभापती पदा करिता नरेंद्र बाल्या बोरकर यांनी दोन नामनिर्देशन पत्र सादर केले होते. यापैकी एका नामनिर्देशनपत्रात सूचक म्हणून रूपा राय तर अनुमोदक विशाखा बांते, तर दुसऱ्या नामनिर्देशन पत्रात सूचक म्हणून नागेश सहारे तर अनुमोदक म्हणून रूपाली ठाकूर होते.

कर आकारणी समिती सभापतीपदी यापूर्वी संदीप जाधव होते. संदीप जाधव यांची सत्तापक्षनेते पदी नियुक्ती झाल्याने महेंद्र धनविजय यांची नियुक्ती करण्यात आली. कर आकारणी समिती सभापती पदाकरिता महेंद्र धनविजय यांचेच एकच नामनिर्देशन प्राप्त झाले असून याकरिता सूचक म्हणून शिल्पा धोटे तर अनुमोदक म्हणून उज्ज्वला शर्मा होते.

नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी यापूर्वी नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती तसेच परिवहन समिती सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. महेंद्र धनविजय यांनी यापूर्वी दुर्बल घटक समिती सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

दोन्ही सभापतींची निवड झाल्यानंतर पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. यावेळी उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते उपस्थित होते.