Published On : Mon, Sep 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नंदनवन पोलिसांच्या हाती सराईत वाहनचोर; ५ लाख ४० हजारांचे सहा चोरीचे वाहन जप्त

Advertisement

नंदनवन पोलिसांच्या हाती सराईत वाहनचोर; ५ लाख ४० हजारांचे सहा चोरीचे वाहन जप्त

नागपूर : नंदनवन पोलिसांनी वाहनचोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत ३१ वर्षीय राहुल उमाकांत ईटनकर याला अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ५ लाख ४० हजार रुपये किमतीची सहा चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात तीन ई-रिक्षा, दोन ॲक्टिव्हा आणि एका मोटारसायकलीचा समावेश आहे. आरोपीच्या अटकेमुळे नंदनवन पोलिस ठाण्यातील पाच, तर गणेशपेठ पोलिस ठाण्यातील एका वाहनचोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.

ई-रिक्षा चोरीनंतर पोलिसांची कारवाई-
नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील के.डी.के. महाविद्यालय मार्गावरील भगवती इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरून ६ सप्टेंबर रोजी ई-रिक्षा चोरीला गेली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्याचवेळी पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती संघर्षनगर चौकात चोरीचा ई-रिक्षा विक्रीसाठी घेऊन येणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राहुल ईटनकर याला चोरीच्या ई-रिक्षासह ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने ई-रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली. यापूर्वी नंदनवन परिसरातील एका दुचाकी चोरीच्या प्रकरणातही आरोपीचे सीसीटीव्ही चित्रण पोलिसांच्या हाती लागले होते. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते.

Advertisement

आरोपीची कसून चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून तीन ई-रिक्षा, दोन ॲक्टिव्हा आणि एक मोटारसायकल असा एकूण सहा चोरीचा वाहनसाठा जप्त करण्यात आला. या वाहनांची एकूण किंमत सुमारे ५ लाख ४० हजार रुपये आहे.

आरोपीकडून मिळालेल्या माहितीनंतर नंदनवन पोलिस ठाण्यातील पाच आणि गणेशपेठ पोलिस ठाण्यातील एका वाहनचोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. आरोपीने आणखी काही वाहनचोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.