Published On : Wed, Mar 13th, 2019

गडकरींविरुद्ध नाना पटोलेच लढणार, काँग्रेसकडून 21 उमेदवारांची यादी जाहीर

Advertisement

नवी दिल्ली : काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. नागपुरातून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच गडचिरोली, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि सोलापूर या मतदारसंघांसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील पाच उमेदवार कोणते?

नागपूर – नाना पटोले

गडचिरोली – नामदेव उसेंडी

मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त

मुंबई दक्षिण – मिलिंद देवरा

सोलापूर – सुशील कुमार शिंदे

काँग्रेसने यापूर्वी पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात उत्तर प्रदेशातील उमेदवारांचा समावेश होता. या दुसऱ्या यादीमध्येही उत्तर प्रदेशातील बहुतांश उमेदवारांचा समावेश आहे. राज बब्बर हे मोरादाबादमधून लढणार आहेत.

महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत. महाआघाडीची चर्चा सुरु असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेमकं किती जागांवर लढणार याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. त्यापूर्वी काँग्रेसने पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. लवकरच इतर नावंही जाहीर केली जाणार आहेत.


पाहा संपूर्ण यादी