नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेसचा कोणता उमेदवार रिंगणात उतरणार यासाठी पक्षाच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्रातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत काँग्रेसची बैठक पार पडली. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांच्यासोबत महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची चर्चा झाली असून यातून काही नावं समोर आली आहेत.
दरम्यान आजच्या बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडणार आहे. संध्याकाळी 4 वाजता महाराष्ट्राच्या लोकसभा उमेदवारांबाबत निर्णय घेण्याकरता ही बैठक होईल. केंद्रीय निवडणूक समितीच्या या बैठकीनंतर राज्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
काँग्रेसच्या ‘या’ उमेदवारांची नावे अघाडीवर
-नागपूरमधून विकास ठाकरेंचं नाव आघाडीवर असून त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांची लढत नितीन गडकरींविरुद्ध होणार आहे.
-अमरावतीहून आमदार बळवंत वानखेडे यांचं नाव आघाडीवर आहे.
-गडचिरोलीहून डॉ. नामदेव उसेंडी यांचं नाव आघाडीवर
-चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर यांची नावं आघाडीवर
-कोल्हापूरहून शाहू महाराजांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
-भिवंडीहून नामदेव चोरगे यांचं नाव आघाडीवर
-रामटेकहून नितीन राऊत, रश्मी बर्वे आणि राजू पारवे यांच्या नावांची चर्चा आहे.