Published On : Wed, Sep 22nd, 2021

गणेशपेठ टी-पॉईंटला संत गाडगे महाराजांचे नाव द्या

श्री संत गाडगेमहाराज विकास मंडळाचे महापौरांना निवेदन

नागपूर, : शहरातील गणेशपेठ टी-पॉईंटला संत गाडगे महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी श्री संत गाडगे महाराज बहुद्देशिय विकास मंडळाद्वारे महापौर दयाशंकर तिवारी यांना करण्यात आली.

Advertisement

यासंदर्भात बुधवारी (ता.२२) शिष्टमंडळाद्वारे महापौरांना निवेदन देण्यात आले. यावेळी मनपाचे स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे, नगरसेवक नागेश सहारे, मंडळाचे अध्यक्ष डी.डी.सोनटक्के, उपाध्यक्ष दयाराम हिवरकर व सचिव रुकेश मोतीकर आदी उपस्थित होते.

संत गाडगे महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासह साक्षतेचा प्रचार केला. आयुष्यभर स्वच्छतेचे कार्य करणा-या गाडगे महाराजांचे तैलचित्र मनपाने मुख्यालयात लावून त्यांच्या कार्याचा सन्मान केला. यासोबतच गणेशपेठ टी-पॉईंटवर संत गाडगे महाराजांचे स्मारकही उभारले. स्मारक असलेल्या या चौकाला मनपाद्वारे रीतसर गाडगे महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाद्वारे करण्यात आली.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement