Published On : Fri, Jul 27th, 2018

नमाज घरात पढा, रस्त्यावर नाही : राज ठाकरे

Advertisement

पुणे : धर्माचे राजकारण बंद करत प्रत्येकाने आपला धर्म घरात पाळावा असे सांगत मुस्लीमांनी नमाज घरात पढावा रस्त्यात नाही असं मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडले . नमाज पढायला रस्ते कशाला हवेत तसेच नमाजासाठीची अजान देण्यासाठी भोंगे कशाला हवेत असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला.

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्‍या मेळाव्यात ते बोलत होते. मी मला भेटणाऱ्या मुस्लीमांना सांगतो की सकाळपासून भोंगे कशाला हवेत नमाजासाठी त्यामुळे ते सगळे बंद करा, असं राज म्हणाले. यासोबतच राज ठाकरे यांनी गुजराती व जैन समाजाबद्दलही आपली भूमिका स्पष्ट केली .

Gold Rate
04 Feb 2026
Gold 24 KT ₹ 1,60,300 /-
Gold 22 KT ₹ 1,49,100 /-
Silver/Kg ₹ 2,87 100 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्रावणामध्ये तसेच पर्युषणामध्ये हे लोक फतवे बंद काढतात की कत्तलखाने बंद करा. कुणी काय खावं काय खाऊ नये हे ज्याचं त्यांनी ठरवावं असं सांगतानाच आम्ही सांगतो का गटारीला तुम्ही प्यायलीच पाहिजे असा टोला त्यांनी लगावला. आपापला धर्म घरात ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करताना राज ठाकरे यांनी धर्माचं राजकारण बंद व्हायला हवं असे सांगितले . राममंदीराचे पण राजकारण करण्यात येत असल्याचा दाखला त्यांनी दिला.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement