नागपूर : नागपूरची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू जेनिफर वर्गीसने बुधवारी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील दोरजी खांडू इनडोअर स्टेडियमवर संपन्न झालेल्या दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धेत 5 सुवर्णपदके पटकावली आहे.
जेनिफरने एकाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. यापूर्वी मालदीव येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत तिने तीन पदके जिंकली होती.
जेनिफरने पाच सुवर्णपदक पटकावल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ती तिच्या कामगिरीवर समाधानी आहे.परंतु, आशियाई चॅम्पियनशिप अधिक कठीण असेल, यातही ती मेहनत घेत आहे.
Advertisement









