Published On : Wed, Jun 3rd, 2026
By Nagpur Today Nagpur News

विदर्भ जलतरण स्पर्धेत नागपूरच्या आर्शतीची सुवर्ण झेप

50 मीटरच्या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदकांची कमाई; वैयक्तिक चॅम्पियनशिप ट्रॉफीवरही नाव कोरले
Advertisement

नागपूर टुडे : नागपूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या विदर्भस्तरीय जलतरण स्पर्धेत अवघ्या 11 वर्षीय कुमारी आर्शती अमोल चिंदमवार हिने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वर्धा येथे लक्ष्मी लाईफ एक्वाटिक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित जलतरण स्पर्धेत आर्शतीने दमदार प्रदर्शन करत तीन सुवर्णपदके पटकावली.

आर्शतीने 50 मीटर फ्रीस्टाईल, 50 मीटर बॅकस्ट्रोक आणि 50 मीटर बटरफ्लाय या तिन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थान मिळवत सुवर्ण हॅट्ट्रिक साधली. स्पर्धेदरम्यान तिने उत्कृष्ट वेळ नोंदवत प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट वर्चस्व राखले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विशेष म्हणजे, तिन्ही प्रकारांतील सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीमुळे आर्शतीला वैयक्तिक चॅम्पियनशिप ट्रॉफी देखील प्रदान करण्यात आली. एवढ्या लहान वयात मिळवलेल्या या यशामुळे तिचे नाव विदर्भातील उदयोन्मुख जलतरणपटूंमध्ये विशेषत्वाने घेतले जात आहे.

आर्शतीच्या या यशामागे तिची कठोर मेहनत, नियमित सराव, जिद्द आणि चिकाटी यांचा मोठा वाटा आहे. तसेच प्रशिक्षक निशांत सर, विलास सर आणि ॲथलेटिक कोच रवींद्र टोंग सर यांचे मोलाचे मार्गदर्शन तिला लाभले. स्पर्धेपूर्वी केलेली तांत्रिक तयारी, फिटनेसवर घेतलेली मेहनत आणि योग्य प्रशिक्षणामुळेच तिला हे यश मिळाल्याचे क्रीडा क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

Advertisement

आर्शतीच्या या चमकदार कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून भविष्यात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ती अशीच उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges