Published On : Sat, Sep 24th, 2022

नागपूरकर जयंत दुबळेचा आंतरराष्ट्रीय विक्रम

माजी महापौर संदीप जोशी यांनी केले अभिनंदन

नागपूर. नागपूर शहरातील प्रतिभावंत जलतरणपटू जयंत दुबळे याने नॉर्थ अटलांटिक महासागर व आयरिश समुद्रातील नॉर्थ चॅनेल पोहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. २० वर्षीय जयंतच्या या आंततरराष्ट्रीय कामगिरीसाठी नागपूर शहराचे माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Advertisement

जयंत दुबळेने १४ तास ३९ मिनिटांमध्ये नॉर्थ अटलांटिक महासागर व आयरिश समुद्रातील नॉर्थ चॅनेल पोहण्याचा विक्रम त्याच्या चमूसह पार केला आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही टिम नॉर्दन आयर्लंड व स्कॉटलंड दरम्यानची नॉर्थ चॅनेल पोहणारी आशिया खंडातील पहिली रिले टिम ठरली आहे.

Advertisement

आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूरकर जयंतने केलेली कामगिरी ही अभिमानास्पद असून नागपूर शहराचे नावलौकीक करणारी ही बाब असल्याचे सांगत शहराचे माजी महापौर तथा खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक श्री. संदीप जोशी यांनी जयंतचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement