नागपूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नागपूर शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी ‘नागपूर टुडे’शी संवाद साधत शहरातील भांडेवाडी यार्डमध्ये सुरू असलेल्या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला.
भांडेवाडी ले-आऊट डंपिंग यार्ड येथे कचऱ्याच्या माध्यमातून कंपोस्ट खताची निर्मती करण्यात येते. नागपूर महानगर पालिकेने यासंदर्भात २०१९ मध्ये Zigma Global Environ Solutions Pvt. लि. या कंपनीला कंत्राट दिले होते. १०१५ रुपये प्रतिटन प्रमाणे मनपाने या कंपनीला कंत्राट दिले होते. २०२२ मध्ये पुन्हा टेंडर रिन्यु करण्यात आले. त्यानंतर आता २०२४ मध्ये पुन्हा मनपाने १०.५० लाख मॅट्रिक टनच्या हिशोबाने हे कंत्राट याच कंपनीला दिले.
मात्र कंपनीकडून कचऱ्याच्या प्रेसिंगमध्ये फेरार केला असून कचऱ्याचे ढिगाऱ्यांवर माती टाकल्याचे उघडकीस आले आहे. हा फार मोठा करोडोचा घोटाळा असल्याचा आरोप तिवारी यांनी केले. गेल्या अनेक वर्षांपासून ट्रॉमल सुद्धा बंद होते. माझ्या आंदोलनानंतर हे ट्रॉमल सुरु झाल्याचे तिवारी म्हणाले.
मनपा आयुक्त अभिजित चौधरी यांना देखील मी यासंदर्भात माहिती दिली असून ते यावर कठोर पाऊल उचलणार असल्याचे आश्वासन त्यांनी मला दिल्याचे तिवारी म्हणाले.
दरम्यान येत्या काही दिवसात Zigma कंपनीने केलेल्या अनेक घोटाळ्यांचा भंडाफोड करणार असल्याचे तिवारी ‘नागपूर टुडे’शी बोलतांना म्हणाले.