Published On : Wed, Oct 6th, 2021
By Nagpur Today Nagpur News

Nagpur ZP Election: नागपूर जिल्हा परिषदवर काँग्रेसचाच झेंडा, पोटनिवडणुकीत BJP ला दोनच जागा

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी आणि 31 पंचायत समितीच्या जागांसाठी काल (5 ऑक्टोबर) मतदान पार पडले. नागपूर जिल्ह्यात एकूण 60 टक्के मतदान झाले. याच निवडणुकीचा निकाल आज (6 ऑक्टोबर) जाहीर करण्यात येत आहे.

नागपूर जिल्हा परिषद: सध्या हाती आलेल्या निकालानुसार 16 जिल्हा परिषद जागांपैकी 9 जागांवर काँग्रेसने विजय मिळवत जिल्हा परिषद काबीज केली आहे. इथे भाजपला फक्त 2 जागी विजय मिळवता आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागांवर विजय मिळाला आहे.

Gold Rate
23 Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,23,300 /-
Gold 22 KT ₹ 1,14,700 /-
Silver/Kg ₹ 1,56,400/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर: जिल्हा परिषद अंतिम निकाल (एकूण जागा 16)

भाजप-02

शिवसेना-00

राष्ट्रवादी-3

काँग्रेस-9

शेकप – 01

गोंडवाना गणतंत्र पार्टी 01

इतर-00

रद्द झालेले जिल्हा परिषद सदस्यत्व

काँग्रेस – 7

राष्ट्रवादी – 4

भाजप – 4

शेकाप – 1

एकूण – 16

आधीचे पक्षीय बलाबल –

काँग्रेस – 31

राष्ट्रवादी – 10

भाजप – 15

शेकाप – 1

शिवसेना – 1

नागपूर जिल्हा परिषदेमध्ये पोटनिवडणुकीनंतर नवे समीकरण –

जिल्हा परिषद एकूण जागा – 58

काँग्रेस – 33 (2 फायदा)

राष्ट्रवादी – 9 (1 नुकसान)

भाजप – 13 (2 नुकसान)

शेकाप – 1 – ( मागील वेळेच्या उमेदवाराने जागा कायम राखली)

सेना – 1 –

गोंडवाना गणतंत्र पार्टी – 1- (1 फायदा)

नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे अपडेट

काटोल तालुक्यातील येनवा जिल्हा परिषद मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे समीर उमप हे 2453 मतांनी विजयी झाले आहे. ही जागा मागील वेळेस शेकापने जिंकली होती. शेकापने आपली जागा कायम ठेवली आहे.

दुपारी 12 वाजेपर्यंत जिल्हा परिषद विजयी उमेदवार

हिंगणा (डिगडोह ): संजय जगताप (काँग्रेस)

मौदा (अरोली) : योगेश देशमुख (काँग्रेस)

काटोल (येणवा): समीर उमप (शेकाप)

कामठी (गुमथळा): दिनेश ढोले (काँग्रेस)

नागपूर (गोधनी): कुंदा राऊत (काँग्रेस)

रामटेक (बोथीया पालोरा): हरीश उईके (गोंगापा )

कामठी (वडोदा): अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस)

काटोल (पारडसिंगा): मीनाक्षी संदीप सरोदे (भाजपा)

पारशिवनी (करभाड ): अर्चना भोयर (काँग्रेस)

नागपूर जिल्हा परिषदमध्ये पोटनिवडणुकीआधी कसं होतं पक्षीय बलाबल

नागपूर जिल्हा परिषदेत एकूण जागा 58 होत्या. त्यापैकी 16 जागा रद्द झाल्या होत्या तर विद्यमान जागा 42 आहेत.

नागपूर जिल्हा परिषदेतील आधीचं पक्षीय बलाबल

काँग्रेस-10

राष्ट्रवादी- 5

शेकाप- 1

भाजप- 16

नागपूर पंचायत समिती पोटनिवडणुकीआधी कसं होतं पक्षीय बलाबल

1) काँग्रेस पक्षाच्या – 31 जागा होत्या, 7 रद्द झाल्या,विद्यमान 24 जागा आहेत

2) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- 10 जागा होत्या, 4 रद्द झाल्या, विद्यमान 6 जागा आहेत.

3)भाजप- 15 जागा होत्या, 4 रद्द झाल्या, विद्यमान 11 जागा आहेत.

4) शिवसेना-1 जागा होती, रद्द 0 झाली, विद्यमान 1 जागा आहे.

5) शेकाप-1 जागा होती, रद्द 1 झाली, विद्यमान 0 जागा

Advertisement
Advertisement