खापा (नागपूर) : शहरातील तरुण मित्रांसाेबत वाकी (ता. सावनेर) येथे देवदर्शन व फिरायला गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. १९) दुपारी घडली असून तब्बल २४ तासानंतर पोलिसांना तरुणाचा मृतदेह सापडला आहे.
शाहीद अख्तर शकील अहमद अन्सारी (३२, रा. माेमीनपुरा, नागपूर) असे मृताचे नाव आहे. शाहीद अख्तर हा त्याच्या काही मित्रांसाेबत रविवारी दुपारी वाकी परिसरात फिरायला आला हाेता. सुरुवातीला त्यांनी ताजुद्दीन बाबांचे दर्शन घेतले.
नंतर दर्ग्याच्या मागे असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात पोहण्याचा मोह त्याला आवरला नाही.मात्र पात्रात उतरल्यानंतर त्याचा डुबून मृत्यू झाल्या. घटनेची माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून शाहीद अख्तरचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र अंधार झाल्यानंतर शोधकार्य बंद करण्यात आले. तब्बल २४ तासांनंतर शाहीद अख्तरचा पोलसांच्या हाती लागला.