Published On : Sat, Nov 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी ८,२६९ पोलिसांचा बंदोबस्त; कमांडो, SRPF आणि BDDS पथके तैनात!

- पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांची माहिती
Advertisement

नागपुरातील गुन्हेगारीचा पोलिस आयुक्तांकडून लेखाजोखा; हुडकेश्वर पोलिस ठाणे आघाडीवर!

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये सुरक्षेचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. अधिवेशन काळात मंत्री, आमदार, व्हीआयपी नेते तसेच आंदोलनकर्त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तब्बल ८ हजार २६९ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि होमगार्ड तैनात राहणार आहेत. पाच SRPF कंपन्या, कमांडो पथके आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातून संपूर्ण शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

शहरातील २,३१९ पोलिसांची जबाबदारी-

अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी नागपूर शहरातील २ हजार ३१९ पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात राहतील. याशिवाय बाहेरील जिल्ह्यांमधून ५ हजार ९५० पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि होमगार्ड मागविण्यात आले आहेत. विधान भवन, रविभवन, मंत्र्यांची निवासस्थाने, मोर्चे आणि आंदोलनांची संभाव्य ठिकाणे येथे विशेष पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

हायटेक यंत्रणेद्वारे पोलिसांचा समन्वय-

Advertisement

सुरक्षा व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी व्हॉट्सॲपसह विविध आधुनिक संपर्क माध्यमांद्वारे एकमेकांच्या संपर्कात राहतील. कमांडो पथकांसह BDDS ची २० पथकेही सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत. अधिवेशनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.