Published On : Fri, Nov 19th, 2021

हिवाळी अधिवेशन नागपुरातच! ७ डिसेंबर पासून विधान भवन येथे सुरु होणार अधिवेशन

नागपुर: हिवाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते. तसेच अधिवेशन मुंबईत घेण्याची मागणी होत होती. मात्र, आता हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असून ७ डिसेंबर पासून हे अधिवेशन विधान भवन येथे सुरु होणार आहे. विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

विधीमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत प्राथमिक तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर अधिवेशन नागपुरात घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जानेवारीनंतर मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे अशा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्दा देखील गाजत आहे. तसेच राज्यातील गांजा, ड्रग्स या मुद्द्यावरून देखील विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या अधिवेशनात आणखी कोणते मुद्दे उपस्थित केले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. विधान परीषदेच्या निवडणुका येत्या १० डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी हिवाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशन जानेवारीत होण्याची शक्यता होती. मात्र, आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हे अधिवेशन होणार आहे. पण, हे अधिवेशन किती दिवसांचं होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. पण, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ख्रिसमसची सुट्टी देखील आली आहे. त्यामुळे अधिवेशन पाच दिवसांचं होणार की आठ दिवसांचं होणार? याबाबत अजूनही शंका आहे.