Published On : Thu, Aug 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील व्हीएचएच्या हॉकी मैदानाला उच्च न्यायालयाचा ‘संरक्षणकवच’; प्रशासनाची ताबा कारवाई तूर्तास थांबली!

Advertisement

नागपूर : सिव्हिल लाइन्स येथील विदर्भ हॉकी असोसिएशनच्या (व्हीएचए) ऐतिहासिक हॉकी मैदानावर प्रशासनाकडून ताबा घेण्याची प्रस्तावित कारवाई अखेर उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे थांबली आहे. आज, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मैदानाचा ताबा घेण्याची तयारी प्रशासनाने केली होती. मात्र, व्हीएचएने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर नागपूर खंडपीठाने प्रशासनाच्या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली.

व्हीएचएने याचिका क्रमांक ६२४१/२०२६ दाखल करून प्रशासनाच्या कारवाईला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत व्हीएचएची बाजू अधिवक्ता शांतनु खेडकर आणि अनुराग मांकर यांनी मांडली. न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी होईपर्यंत प्रशासनाने मैदानाचा ताबा घेऊ नये, असे निर्देश दिल्याने व्हीएचएला मोठा दिलासा मिळाला आहे.

Gold Rate
Sept 28,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 49,200 /-
Gold 22 KT ₹ 1,38,500 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

३.८० एकर मैदानाचा ताबा घेण्याची होती तयारी-
सिव्हिल लाइन्स येथील व्हीएचएच्या सुमारे ३.८० एकर जागेचा ताबा घेण्यासाठी नायब तहसीलदार (नझूल) कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली होती. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ताबा घेण्याची कारवाई निश्चित करण्यात आली होती. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात व्हीएचएने प्रथम विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. मात्र, तेथे अपेक्षित दिलासा न मिळाल्याने अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

‘सध्या यश मिळाले’; व्हीएचएचा दिलासा-
व्हीएचएचे समन्वयक कृष्णा जोशी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. प्रशासनाच्या कारवाईला तूर्तास स्थगिती मिळाल्याने सध्या आम्हाला यश मिळाले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

१७ जुलैपासून वादाला मिळाले होते वेगळे वळण-
या प्रकरणाला १७ जुलै रोजी वेगळे वळण मिळाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीएचएची लीज संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मैदानाचा ताबा शासनाच्या अधीन घेण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या.

मात्र, हे मैदान नागपूरच्या हॉकी इतिहासाचा महत्त्वाचा भाग असल्याचा दावा व्हीएचएकडून करण्यात आला आहे. मैदान वाचविण्यासाठी संघटनेने न्यायालयीन लढा सुरू केला आहे. उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रशासनाची आजची कारवाई थांबली असून, आता पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे नागपूरच्या क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.