Published On : Tue, Aug 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात घरासमोर लघुशंकेवरून वाद; चुलत भावाच्या डोक्यात काठीने मारहाण

Advertisement

Auto Draft

नागपूर : शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरासमोर लघुशंका करण्यावरून झालेल्या वादात एका युवकाने चुलत भावाच्या डोक्यात लाकडी काठीने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात युवक जखमी झाला असून त्याच्यावर मेयो रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी शांतिनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ही घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी लालगंज झाडे चौक, बैरागापुल परिसरातील शिवमंदिराजवळ घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, लखन दुलीचंद अरखेल यांच्या पत्नीने घरासमोर लघुशंका करण्यास आरोपीच्या भावाला विरोध केला. यावरून वाद निर्माण झाला. या वादातून राजा रॉकी टिंगू कपूरदास अरखेल याने लखन यांच्या डोक्यात लाकडी काठीने वार केला.

या हल्ल्यात लखन जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची तक्रार मिळाल्यानंतर शांतिनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.