नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवरून आज भारतीय जनता पार्टी आणि भाजयुमो कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. कुलगुरूंच्या केबिनसमोर झालेल्या आंदोलनादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने परिसरातील गमले फोडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात होत असलेला विलंब, परीक्षा व्यवस्थेतील अव्यवस्था आणि विद्यापीठ प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणाविरोधात भाजप आणि भाजयुमोने विद्यापीठ परिसरात आंदोलन छेडले. प्रशासनाच्या अनास्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी कुलगुरू कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान एका कार्यकर्त्याने रागाच्या भरात तेथील गमले फोडले. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संबंधित कार्यकर्त्यासह काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर विद्यापीठ परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





