Published On : Sat, Nov 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दुचाकी चोर रंगेहात पकडला; चार चोरीच्या गाड्या जप्त, आरोपीला अटक

Advertisement

Auto Draft

नागपूर : नागपुरात दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना अजनी पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. भगवान नगर गार्डन परिसरात दुचाकीचे हँडल तपासून चोरीची संधी शोधत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. प्रकाश गौरीशंकर बगौरे (२८, रा. सिवनी, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. चौकशीदरम्यान त्याने अजनी हद्दीतून तीन आणि बेलतरोडी परिसरातून एक अशा चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी चारही चोरीच्या दुचाकी जप्त केल्या.

१२ नोव्हेंबर रोजी गजानन नगर, ओंकार नगर चौक परिसरातील विष्णू वाघमारे यांच्या पत्नीची मोपेड घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना भगवान नगर गार्डनजवळ संशयित हालचाली करताना आरोपी पोलिसांच्या नजरेस पडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता वाहनचोरीचे प्रकार उघड झाले. या चोरीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.