नागपुर टुडे चे पत्रकार रविकांत कांबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर फिअरलेस जर्नलिजम मुखनायक पत्रकारिता पुरस्काराने सम्मानित करण्यात आले
शोषितांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’ पाक्षिक 31 जानेवारी 1920 रोजी सुरू केले होते. ‘मूकनायक’ला शंभर वर्ष उलटले. या शताब्दी वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर फिअरलेस जर्नालिजम पत्रकारिता पुरस्काराचा बहुमान नागपुर टुडे चे पत्रकार सीनियर क्राईम रिपोर्टर रविकांत कांबळे यांना देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स (बानाई), द बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आंबेडकर टीव्ही व दैनिक प्रबुद्ध भारतच्या वतीने हा कार्यक्रम शनिवारी पार पडला. ऊरवेला कॉलोनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आयोजित कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून दैनिक देशोन्नतीचे संपादक व शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांची उपस्थिती होती.
यावेळी रातुम नागपूर विद्यापीठाचे आंबेडकरी विचारधारा विभागाचे प्रमुख प्रदीप आगलावे सर, आंबेडकरी साहित्यीक इंजि. राहुल वानखेडे, बानाईचे सचिव इंजी. जयंत इंगळे यांची उपस्थिती होती.