नागपूर – शहरात सुरू असलेल्या विशेष गुन्हेगारी चेकिंग मोहिमेंतर्गत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशानुसार सलग तिसऱ्या दिवशीही डीबी पथकांनी विविध परिमंडळांमध्ये मोठी कारवाई केली. या मोहिमेत एकूण २४९ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.
कारवाईचा तपशील-
परिमंडळ 1: प्रतापनगर, हिंगणा, वाडी, एमआयडीसी, बजाजनगर – 52 आरोपी
परिमंडळ 2: सीताबर्डी, अंबाझरी, धंतोली, सदर, गिट्टीखदान, मानकापूर – 49 आरोपी
परिमंडळ 3: गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर – 26 आरोपी
परिमंडळ 4: इमामवाडा, नंदनवन, सक्करदरा, हुडकेश्वर, बेलतरोडी, वाठोडा – 50 आरोपी
परिमंडळ 5: जुनी व नवीन कामठी, कळमना, यशोधरानगर, जरीपटका, पारडी, कोराडी – 72 आरोपी
या कारवाईत बॉडी ऑफेंडर (71), जेलमधून सुटलेले (3), हिस्ट्रीशीटर (15), मोक्का (20), एनडीपीएस (3), एमपीडीए (17), तडीपार (49), बालक गुन्हेगार (6) व दारू विक्री प्रकरणातील (1) आरोपींना झाकण्यात आले.
विशेष बाबी-
कळमना पोलिसांनी खून प्रकरणातील आरोपी शुभम शर्मावर प्रतिबंधात्मक कारवाई करत डोजियर फॉर्म भरला.
बेलतरोडी पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील आरोपी शंकरलाल झारिया याची नोंद ‘सिंबा’ प्रणालीत केली.
8 मोबाईलसह 1.04 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
काही आरोपी ऑटो रिक्षा चालक, सिक्युरिटी गार्ड, ढाबा-मालक, हॉटेल व चायनीज स्टॉल चालवणारे असल्याचे समोर आले.
पोलीस आयुक्तांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत की, गुन्हेगारांची पार्श्वभूमी तपासूनच कामावर ठेवण्यास परवानगी द्यावी. तपास दरम्यान आरोपींच्या घरी जाऊन माहिती गोळा करण्यात आली. काही आरोपी घरात मिळाले, काही बाहेरगावी असल्याचे आढळले.
पोलीस आयुक्तांचा इशारा:
गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, डार्क झोन परिसरांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. कोणत्याही गुन्ह्यापूर्वी गुन्हेगारांनी विचार करावा, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.