Published On : Wed, Jul 22nd, 2015

नागपुर (सावनेर) : आता आम्ही जावे तरी कोठे !

 

शैक्षणिक वर्ष वाया जाणार याला ज़बाबदार विद्यापीठ की प्राचार्य? 

nagpur-university
सवांददाता / किशोर ढूंढेले

सावनेर। इयत्ता बाराविचा निकाल लागुन जवळ-जवळ 2 महीने होत आहे. बहुतांश विद्यार्थी अजुनही विज्ञान व कला वाणिज्य शाखेत प्रवेशापासुन वंचित आहे. विद्यालय सुरु होउन शेक्षणिक वर्ग सुरु झाले आहे. परंतु अनेक विद्यार्थी अजुन पर्यंत प्रवेशाचा प्रेतिक्षेत आहे. वारंवार विद्यालयाचा फेऱ्या मारत आहे. वाढीव प्रवेशाचे परिपत्रक विद्यापीठ काढणार की नाही याचे कुठलेही संकेत दिसून येत नाही. विध्यापिठाने एक स्पष्ट भूमिका घेउन विद्यार्थी व पालक वर्गाना कळवावे. जेणेकरून पुढील मार्ग विद्यार्थ्यांकरिता मोकळा होइल.

एकीकडे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ काने सर वृत्तपत्राशी बोलतांना सांगतात की 5 ते 10 दिवसात वाढीव प्रवेशाचे परिपत्रक काढन्यात येइल. परंतु 10 जुलाई पासून 22 जुलाई ला 12 दिवस होत असून अजुन पर्यंत कुठल्याच प्रकारचे परिपत्रक निघाले नसल्याने विद्यार्थी वर्गासमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याचे नियमित वर्ग सुरु झाले असून शिकवणी वर्ग होत आहे. परंतु प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी मात्र प्रवेशाचाच प्रतिक्षेत दिसून येत आहे. तालुक्यातील भालेराव विज्ञान महाविद्यालय, डॉ. हरिभाऊ आदमाने कला वाणिज्य महाविद्यलय, रामगनेश गडकरी महाविद्यलय व तालुक्यातील इतर महाविद्यालयानी नागपुर विद्यापिठात वाढीव प्रवेशाची मागणी केली असून प्रवेश यादी व प्रतीक्षा यादी सोबत जोड़लेली आहे. परंतु अजुन पर्यंत कोणत्याच महाविद्यलयाला वाढीव प्रवेश मिळालेला नसल्याने सर्वत्र विद्यार्थी वर्गात चिंतेचे वातावरण दिसत आहे. आता या गंभीर समस्याकड़े म़ा.शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लक्ष देऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याना प्रवेश मिळण्याकरिता त्वरीत पाउल उचलावे व विद्यार्थ्यांचे शेक्षणिक वर्ष वाया न जाऊ देता त्यांना त्वरित प्रवेश मिळुन द्यावा अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गाकडून होउ लागली आहे.

युवक कांग्रेस तर्फे चक्काजाम आंदोलनाचा इशारा
सावनेर विधानसाभा युवक कांग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे यांनी दिनांक 9 जुलाई ला भालेराव सायंस कॉलेजचे प्राचार्य डॉ. पराग निमिषे यांना विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहु नये या करिता निवेदन सादर केले होते व आता 12 दिवस होउन कुठल्याच प्रकारचे प्रवेशाकरिता मार्ग दिसत नसल्याने भालेराव सायंस कॉलेज येथे विद्यार्थी सह सावनेर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष राजेश खंगारे, उपाध्यक्ष प्रवीन झाडे यांचा नेत्रुत्वात असंख्य कार्यकर्त्यासह चक्काजाम व आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती राजेश खंगारे यांनी दिली आहे.