Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, May 30th, 2015

  नागपूर : अंबाझरी तलाव बांध (जॉगिंग ट्रॅक) व परिसरमध्ये स्वच्छता अभियान


  टप्पा ४ अंतर्गत मनपा पदाधिकारी व कर्मचार्यांचे श्रम संपूर्ण परिसर स्वच्छ 

  महापौर प्रवीण दटके यांच्या उपस्थित श्रमदान, १२ टन कचरा गोळा संपूर्ण परिसर स्वच्छ

  Safayi Abhiyan Mohim Photo 29 May 2015 (1)
  नागपूर। भारत स्वच्छता अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकातर्फ मनपा ४ फेरी दहावी झोन अंतर्गत अधिकारी व कर्मचार्यांनी दि. २९ मे २०१५ रोजी अंबाझरी तलाव बांध परिसरात संपूर्ण परिसराची स्वच्छता करून श्रमदान केले. मनपा तर्फे दर शुक्रवारी सकाळी ७ ते १० दरम्यान झोन निहाय स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदान उपक्रम नियमित सुरु आहे.

  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या संकल्पनेतून सर्व झोन मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित येवून अंबाझरी तलाव काठावरील परिसराची स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्रमदान करण्याचे आयोजित केले. त्यानुसार २९ मे २०१५ रोजी महापौर प्रवीण दटके यांचे मार्गदर्शनाखाली धरमपेठ झोन सभापती वर्षा ठाकरे व हनुमान नगर झोन सभापती सारिका नांदुरकर व अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता श्रमदान केले. व संपूर्ण तलाव बांध परिसर स्वच्छ केले. यावेळी १२ टन कचरा गोळा करण्यात आला. व संपूर्ण तलाव बांध परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले. १ किलोमीटर लांबीचा अंबाझरी तलावाचा बांध दहा झोन मध्ये विभाजित करण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक झोनला १०० मीटरचा बांध (जॉगिंग ट्रॅक) व त्या लगतचा परिसर स्वच्छ करण्याची जवाबदारी सोपवण्यात आली. प्रत्येक झोन मधील सहायक आयुक्त, अधिकारी और कर्मचारी यांचा सोबतीला मनपा मुख्यालयात कार्यरत विभाग प्रमुख यांना सहकार्य करिता नेमण्यात आले आहे.

  या श्रमदानात पदाधिकारी मनपा विभागप्रमुख व सहा. आयुक्त यांच्या मदतीने झोन अधिकारी व कर्मचारी यांनी तलावाच्या दोन्ही बाजूकडील उतार भागातील काटेरी झुडपे, गवत कापून पडलेला पाला पाचोळा व प्लास्टीक बॉटल, पन्नी, गवत इत्यादी वेचून समूळ गवत कापून एकत्रित जमा करण्यात आले व संपूर्ण परिसर सफाई करून स्वच्छ करण्यात आला. यावेळी महापौर प्रवीण दटके, धरमपेठ झोन सभापती वर्ष ठाकरे व नगरसेविका सारिका नांदुरकर, उपायुक्त आर. झेड. सिद्दिकी, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांनी परिसरात स्वतः स्वयंत्पुर्तीने कचरा वेचून श्रमदान केले व अधिकारी व कर्मचारांचा उत्साह वाढवीत होते.

  Safayi Abhiyan Mohim Photo 29 May 2015 (2)
  यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्येक झोन निहाय वेगवेगळ्या वेगवेगळ्या रंगाचे टी-शर्ट कर्मचार्यांनी घातले. त्या टी-शर्ट वर झोन क्रमांकांचे नाव लिहले असल्याने कोणत्या झोनचा ग्रुप आहे. याची माहिती होत होती. यावेळी महापौर प्रवीण दटके यांनी नेमून दिलेल्या दहा झोनच्या कर्मचार्यांसोबत महापौर यांनी स्वतः श्रमदान करून कर्मचार्यांचा उत्साह वाढवीत होते व स्वतः कचरा उचलून प्रोत्साहित करीत होते.

  यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, नगरमंत्री गायकवाड, विकास अभियंता राहुल वारके, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जयस्वाल, मनपाचे लेखा उप संचालक अ.भा. कुंभोजकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. दिपक दासरवार, कार्यकारी अभियंता (स्लम), सतीश नेरळ, सहा. आयुक्त सा.प्र.वी. महेश धमेचा, कार्यकारी अभियंता मनोज तालेवार, स्थावर अधिकारी डी. डी. जांभूळकर, पशु चिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वाहतूक अभियंता एस.एल. सोनकुसरे, एलबीटी विभागचे सहा. आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह सर्व झोनचे सहा. आयुक्त, गणेश राठोड, राजेश कर्हाडे, विजय हुमणे, महेश मोरोणे, अशोक पाटील, हरीश राउत, प्रकाश वर्हाडे आदीसह सर्व झोन चे अभियंता अनिल कडू, अरुण मोगरकर, सुधीर माटे, अमीन अख्तर, सर्व झोनचे आरोग्य झोनल अधिकारी त्याचप्रमाणे अंबाझरी तलाव जलसंवर्धन समिती चे अजय कडू, राम मुंजे, योगेश तोतडे, जयंत ठाकरे, सर्व झोनचे कनिष्ठ व शाखा अभियंता झोनल आरोग्य निरीक्षकासह बहुसंख्य कर्मचारी स्वच्छता श्रमदानात सहभागी होऊन श्रमदान केले. यावेळी अंबाझरी तलाव जलसंवर्धन समिती चे पदाधिकारी यांनी स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबविल्या बद्दल महापौर प्रवीण दटके यांनी अभिनंदन केले.

  Safayi Abhiyan Mohim Photo 29 May 2015
  अंबाझरी बांधाचा उतार जास्त असल्यामुळे कर्मचार्यांनी स्वच्छतेचे काम करण्याकरिता जागो-जागो जागी झाडाला दोरखंडे बांधून दोरखंडच्या सहाय्याने ते हात धरून कचरा गोळा करून स्वच्छता करीत होते व जमा झालेला कचरा त्वरित उचलण्यात येत होते. साफ-सफाई दरम्यान कुठलीही ईजा व अपघात होऊ नये याकरिता अग्नीशामक विभागातर्फे २ बोटी व अग्नीशमन विभागाचे कर्मचारी ठेवण्यात आली व वैद्यकीय सेवा करिता मोबाईल रुग्णवाहिका व सर्पमित्र यांची व्यवस्था करण्यात आली होती.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145