Published On : Mon, Jul 20th, 2015

नागपूर (सावनेर) : शासनाचा आदेशाला केराची टोपली

Advertisement

विद्यार्थी पालक वर्गात चिंतेचे वातावरण 

सावनेर (नागपूर)। इयत्त बाराविचा परीक्षेत मागचा वर्षीपेक्षा या वर्षी अधिक प्रमाणात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने कला व विज्ञान शाखेत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असून अजूनही बहुतांश विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले नसून विद्यापीठानी वृत्तपत्रात जाहिर केलेल्या वाढीव प्रवेशाकरिता लवकरच परिपत्रक काढणार असल्याचे सांगितल्याने विद्यार्थी मोठया आतुरतेने प्रवेशाची वाट बघत आहे.

13 जुलाईला महाराष्ट्र शासनाने मा. कुलगुरु यांना पत्र पाठविले की राज्यातील विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहु नये या करिता करावयाचा उपाययोजना व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची वाढ़लेली संख्या पाहता प्रवेशामध्ये अडचणी निर्माण होतील असे शासनाचा निर्देशनात काही लोकप्रतिनिधी आणून देत आहे. त्यामुळे राज्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहणार नाही या करिता आवश्यक ती उपाययोजना करावी असे पत्रक रनजीत अहिरे कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी 13 जुलाईला पत्रकात नमूद केले आहे व सर्व प्राचार्यानी पत्रकाप्रमाणे योग्य ती करवाई करावी असे आदेश दिले असूनही अजुन पर्यंत कुठल्याच प्रकारची उपाय योजना प्राचार्य किंवा विद्यापिठाने केलेली नाही त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दररोज महाविद्यालयात जाउन तासन तास बसून प्रवेशाचा आशेने गोर गरीब विद्यार्थी बसलेले दिसून येत आहे.प्राचार्य व प्रवेश कमिटी यांना विद्यार्थी पालक प्रवेशा संबंधी विचारना करतात तेव्हा अजुन पर्यंत विद्यापीठातुन वाढीव प्रवेशाचे परिपत्रक आलेले नसल्याने आम्ही कुठल्याच प्रकारे प्रवेशा संबंधी मदत करू शकत नाही असे उत्तर मिळत असल्याने आता आपल्याला प्रवेश मिळनार नाही व आपले शेक्षणीक वर्ष वाया जाणार या चिंतेमूळे विद्यार्थ्यांचे डोळ भिजत असल्याचे दुर्मिळ चित्र बघायला मिळत आहे. नागपुर विद्यापीठाचे कुलगुरु यांनी विद्यार्थ्याचा शेक्षणीक वर्षाचा विचार करुण त्वरित वाढीव प्रवेश परिपत्रक काढावे अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गाकडून होउ लागली आहे.

Students for admission

File Pic