Published On : Tue, Jul 21st, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात पैशांच्या वादातून जीवघेणा हल्ला; मित्रावर चाकूने सपासप वार, एकाला अटक

Advertisement


नागपूर : नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या व्यवहाराच्या वादातून एका युवकावर त्याच्याच मित्राने दोन साथीदारांसह जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी दुचाकीला कट मारून युवकाला खाली पाडले आणि त्यानंतर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

यशोधरानगर परिसरातील माजरी पुलिया येथे ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सय्यद इरशाद याचा दोन दिवसांपूर्वी पैशांच्या व्यवहारावरून शेख इकराम याच्याशी मोबाईलवर वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून इकरामने दोन साथीदारांसह इरशादवर हल्ल्याचा कट रचला.

घटनेच्या रात्री इरशाद आपल्या मित्रासह दुचाकीने जात असताना आरोपींनी त्याच्या दुचाकीला कट मारून खाली पाडले. त्यानंतर इकराम आणि त्याच्या साथीदारांनी इरशादच्या पाठीवर, छातीवर आणि काखेजवळ चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. स्थानिकांच्या मदतीने जखमी इरशादला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी शेख इकराम आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शेख इकरामला अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

प्राथमिक तपासात सय्यद इरशाद आणि शेख इकराम हे एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही दोघे खुनाच्या प्रयत्नाच्या एका प्रकरणात कारागृहात होते. दोघांनाही अमली पदार्थांचे व्यसन असल्याचे समोर आले असून, त्यातूनच पैशांच्या व्यवहारावरून निर्माण झालेला वाद या रक्तरंजित हल्ल्याचे कारण ठरल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.