नागपूर : महिला पोलीस कर्मचारी आणि कार्यालयात येणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी ‘श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था’ यांनी एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला आहे. संस्थेतर्फे नागपूर पोलीस आयुक्तालय आणि गणेशपेठ पोलीस स्टेशनला मिळून चार सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट देण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा शुभारंभ नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नूतनताई रेवतकर, सचिव पूनम रेवतकर, उपाध्यक्षा पायल रेवतकर, कोषाध्यक्ष आकाश रेवतकर, तसेच पोलीस उपायुक्त दीपक अगरवाल उपस्थित होते.
महिला पोलिसांच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष देत, संस्थेने तीन मशीन पोलीस आयुक्तालयात आणि एक मशीन गणेशपेठ पोलीस स्टेशनला सुपूर्द केली आहेत.
संस्थेच्या या सामाजिक पुढाकाराचे उपस्थितांनी कौतुक केले असून, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य संवर्धनाच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.











