नागपूर : शहरातील कामठी परिसरात मानवतेला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एका महिला साथीदाराविरोधात गंभीर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. पीडितेची आई कामावरून घरी परतल्यावर मुलगी घरी नसल्याचे लक्षात आले. चौकशी केल्यावर शेजारी राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने तिला जेवणाच्या बहाण्याने बाहेर नेल्याचे समोर आले.
रात्री १० वाजेपर्यंत मुलगी परत न आल्याने चिंताग्रस्त आईने शोधाशोध सुरू केली. तपासादरम्यान उघड झाले की, संबंधित महिलेने अल्पवयीन मुलीला फूस लावून मुख्य आरोपी चंदन मरई याच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवले आणि एका घरात नेले. तेथे आरोपीने मुलीला घराच्या छतावर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला.
पोलिसांची कारवाई-
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायदा, २०१२ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणात महिलेची भूमिका अत्यंत गंभीर मानली जात असून, तिनेच मुलीला आरोपीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
नागपुर में आधी रात घर में घुसकर युवती से लूट #nagpurnews #crime...
मात्र 10 मिनट में 10 लाख के मोबाइल फोन चोरी कर हुआ...
NAGPUR TODAY | TOP - 10 NEWS | 27 JUNE 2026 #newsupdate...
नागपुर में देह व्यापार का भंडाफोड़ #nagpurnews #Crime #prostitute #NewsUpdate #latestnews
नागपुर के प्रतापनगर में खड़ी दो गाड़ियों में लगाई आग #nagpurnews #NewsUpdate...









