Published On : Wed, Apr 28th, 2021

25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, नागपुरात वरिष्ठ डॉक्टरला बेड्या

Advertisement

नागपूर : वरिष्ठ डॉक्टरने सहकारी महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. 25 वर्षीय डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरिष्ठ डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Nagpur Senior Doctor allegedly Molested 25 years old Lady Doctor in COVID Hospital)

नागपूरमध्ये मानकापूर परिसरातील कोव्हिड हॉस्पिटलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सिनीअर डॉक्टरने 25 वर्षीय महिला डॉक्टरवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चेंजिंग रुममध्ये बोलवून त्यांनी डॉक्टरशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपी डॉक्टरला अटक

पीडित डॉक्टरच्या तक्रारीनंतर डॉक्टर नंदू रहांगडाले यांच्यावर मानकापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी डॉक्टरला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Advertisement