
धमकीनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून संबंधित शाळांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वी पोलिसांनी शाळांच्या परिसराची सखोल तपासणी केली होती. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक आढळले नसल्याची माहिती आहे.
धमकीचे ई-मेल बांगलादेश आणि फ्रान्समधून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ई-मेलचा स्रोत आणि धमकीमागील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, नागपूर पोलिसांनी संबंधित शाळांच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवली असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून पालकांनी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



