Published On : Sat, Sep 7th, 2019

स्मार्ट सिटीच्या रॅकिंगमध्ये नागपूर प्रथम क्रमांकावर

स्मार्ट अॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलमेंट कारपोरेशन लिमीटेड ला केंद्र सरकारचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयने स्मार्ट सिटीच्या रॅकिंगमध्ये प्रथम क्रमांक दिला आहे.

शुक्रवारी केंद्र सरकारने शंभर स्मार्ट सिटीचे रॅकिंग जाहिर केले असून व्दितीय स्थानावर अहमदाबाद आहे. नागपूर शहर ३६४.४७ गुण घेऊन प्रथम क्रमांकावर आहे. तर अहमदाबाद शहर ३६२.३४ गुण घेऊन व्दितीय क्रमांकाचे स्थान प्राप्त केले आहे. नागपूरला २.१३ गुण जास्त मिळल्यामुळे प्रथम क्रमांकाचे स्थाना पटकाविले आहे. मागील चार महिन्याच कालावधीत केलेल्या प्रयत्नामुळे शहराला हे स्थान प्राप्त झाले आहे.

स्मार्ट सिटीच्या अंतर्गत शहरात २१ प्रकल्पांवर कार्य सुरू असून ५१ किलोमीटर चे रस्ते व होम स्विट होम चे कार्य सुद्धा प्रगतीपथावर आहे.

नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत ३६०० सीसीटीव्ही शहरात विविध स्थानी लावण्यात आले असून याच्या माध्यमातून नागपूर शहर पॉलीसीला अपराधावर नियंत्रण ठेवण्यास मदत होत आहे. आपत्तीव्यवस्थापन मध्ये सुद्धा सीसीटीव्हीचे फार मोठे योगदान आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत पारडी, भरतवाडा, पुनापुर व भांडेवाडीच्या १७३० एकर क्षेत्रात विकास कार्य प्रस्तावीत केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ३३२२ करोड रूपयाचे विकास कार्य प्रस्तावित आहे. पुर्व नागपूरचे आमदार श्री. कृष्णा खोपडे, स्थायी समिती सभापती श्री. प्रदीप पोहाणे व स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने उपरोक्त विकास कार्य सुरू आहे.