Published On : Mon, Mar 25th, 2019

नागपूर लोकसभा मतदार संघात 27 उमेदवारांचे 34 नामनिर्देशन पत्र तर रामटेक मध्ये 22 उमेदवारांचे 29 नामनिर्देशन पत्र दाखल

Advertisement

नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नागपूर लोकसभा मतदार संघातून आज उमेदवारी सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी 34 नामनिर्देशनपत्र सादर केली आहेत. या मतदार संघात आजपर्यंत 39 उमेदवरांनी 48 नामनिर्देशनपत्र सादर केली आहेत.

रामटेक लोकसभा मतदार संघात नामनिर्देशन सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी 22 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर केले असून नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत 24 उमेदवारांनी 32 नामनिर्देशनपत्र सादर केली आहेत.

Advertisement
Advertisement

लोकसभेच्या निवडणूकीसाठी नागपूर लोकसभा मतदार संघात सादर केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये 1) नितीन जयराम गडकरी – भारतीय जनता पक्ष (4 उमेदवारी अर्ज), 2) साहील बालचंद्र तुरकर-भारतीय मानवधिकारी फेडरल पार्टी, 3) गोपालकुमार गणेशू कश्यप – छत्तीसगड स्वाभीमान मंच, 4) डॉ.मनिषा बांगर – पिपल पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॉटीक), 5) नानाभाऊ फाल्गुनराव पटोले – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,( 3 अर्ज), 6)विठ्ठल नानाजी गायकवाड – हम भारतीय पार्टी, 7) विनोद काशीराम बडोले – अखिल भारतीय सर्वधर्म समाज पार्टी, 8) उदय रामभाऊ बोरकर – अपक्ष, 9) दीक्षिता आनंद टेंभूर्णे – देश जनहीत पार्टी, 10) सुनील सुर्यभान कवाडे – अपक्ष, 11) पल्लवी नंदेश्वर – पिपल पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक), 12) सचिन जागोराव पाटील – अपक्ष, 13) निलेश महादेवराव ढोके – अपक्ष, 14) श्रीधर नारायण सावळे – राष्ट्रीय जनसंभावना पार्टी, 15)सिद्धार्थ आसाराम कुर्वे – भारतीय दलित पँथर, 16) सचिन हरीदास सोमकुअर – अपक्ष, 17) रविकांत शंकर मेश्राम – बहुजन मुक्ती पार्टी, 18) प्रफुल्ल मानिकचंद भांगे – अपक्ष, 19) आनंदराव मांगोजी खोब्रागडे – अपक्ष, 20) मनसूर जयदेवजी शेंडे – अपक्ष, 21) सतीश विठ्ठल निखार – अपक्ष, 22) अली अशफाक अहमद – बहुजन मुक्ती पार्टी, 23) मनोहर पुंडलिकराव डबरासे – वंचित बहुजन आघाडी (2 अर्ज), 24) योगेश रमेश जयस्वाल – विश्वशक्ती पार्टी, 25) मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहीम शेख – बहुजन समाज पार्टी, 26) हरेश क्रिष्णराव निमजे – अपक्ष ( 2 अर्ज), 27) असीम अली – मायनॉरिटीज डेमोक्रेटीक पार्टी.

नागपूर लोकसभा मतदार संघात यापूर्वी 14 नामनिर्देशनपत्र सादर केली होती. यामध्ये 1) अब्दुल करीम अब्दुल गफ्फार पटेल – एआयएम, 2) ॲड . उल्हास शालिकराम दुपारे – अपक्ष, 3) दीपक लक्ष्मणराव मस्के – अपक्ष, 4) मनोज कोटुजी बावने – अपक्ष, 5) प्रभाकर पुतनाजी सातपैसे – अपक्ष, 6) ॲड . विजया दिलिप बागडे – आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया, 7) रुबेन्ट डोमोनिक फान्सिक – अपक्ष, 8) कार्तिक गेंदालाल डोके – अपक्ष, 9) माने सुरेश तातोबा – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ( 3 अर्ज), 10) वनिता जितेंद्र राऊत – अखिल भारतीय मानवता पक्ष, 11) सौ. खुशबू मुकेश बेलेकर – बळीराजा पार्टी, 12) योगेश कृष्णराव ठाकरे – सीपीआय (एमएल) रेडस्टार.

रामटेक लोकसभा मतदार संघात सादर केलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये 1) शैलेश संभाजी जनबंधू – सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया, 2) कृपाल बालाजी तुमाने – शिवसेना, 3) अर्चना चंद्रकुमार उके – राष्ट्रीय जनसंभावना पार्टी, 4) लक्ष्मण ज्योतिक कान्हेकर – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक), 5) विनोद भिवाजी पाटील – आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडिया, 6) किशोर उत्तमराव गजभिये – इंडियन नॅशनल काँग्रस, 7) सचिन भिमराव शेंडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक), 8) गजानन दाजिबा जांभुळकर – इंडियन नॅशनल काँग्रेस व अपक्ष (2 अर्ज), 9) नथ्थु माधव लोखंडे – अपक्ष, 10) सोनाली रविंद्र बागडे – अपक्ष, 11) अनिल महादेव ढोणे – अपक्ष, 12) किरण प्रेमकुमार रोडगे – वंचित बहुजन आघाडी, 13) रंजीत हलके सफेलकर – अपक्ष, 14)गौतम श्रीराम वासनिक – अपक्ष, 15) प्रकाश टेंभूर्णे – अपक्ष, 16) संदेश भिवराम भालेकर – बहुजन मुक्ती पार्टी, 17)ललित शामकुवर – बहुजन मुक्ती पार्टी, 18) गोपाल अजबराव तुमाने – अपक्ष, 19) कांतेश्वर खुशालजी तुमाने – अपक्ष, 20) दीपचंद गजानन शेंडे – गोंडवाना गणतंत्र पार्टी, 21) सौ. मिनाताई करणसिंह मोटघरे – अपक्ष, 22) सुभाष धर्मदास गजभिये – बहुजन समाज पार्टी.

रामटेक लोकसभा मतदार संघात यापूर्वी 3 नामनिर्देशनपत्र सादर केली होती. यामध्ये 1) कॉ. बंडू रामचंद्र मेश्राम – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एमएल) रेडस्टार, 2) चंद्रभान बळीराम रामटेके – राष्ट्रीय जनसुराज्य पार्टी ( 2 अर्ज).

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement