Published On : Wed, May 22nd, 2019

नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरच

Advertisement

रेल्वे प्रशासनाचा मनपाकडे प्रस्ताव महापालिका आयुक्तांसमोर सादरीकरण

नागपूर: नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानक आता बदलणार आहे. त्याचा पुनर्विकास लवकरच होणार आहे. बुधवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने याबाबतीचे सादरीकरण महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यापुढे सादर केले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी महापालिकेचे नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गांवडे, आयआरएसडीसीचे तज्ज्ञ वास्तूविशारद पी.एस.उत्तरवार, आयआरएसडीसीचे कार्य.महाव्यवस्थापक अश्विनी कुमार, उपमहाव्यवस्थापक (अर्बन डिझायनर) परोमिता रॉय, वास्तू विशारद आलिशा अकबर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी अश्वीनी कुमार व पी.एस.उत्तरवार यांनी प्रकल्पाची माहीती दिली. परोमिता रॉय आणि आलिशा अकबर यांनी स्थानकाचा विकास कसा करण्यात येणार आहे. त्यामध्ये कोणकोणत्या सुविधा राहणार आहे, यासंदर्भात पीपीटीद्वारे सादरीकरण केले. नागपूर रेल्वे स्थानकाचे पुर्नविकास हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असून आधुनिक सुविधाने परिपूर्ण असे भारतातील क्लास १ चे स्थानक तयार होणार आहे.

वर्ल्ड क्लासच्या धर्तीवर नागपूर मध्यवर्ती स्थानकाचा विकासाच्या योजनेला गती देण्याचे काम सुरू आहे. आयआरएसडीसीने देशभरातील निवडलेल्या ए१ क्षेणीतील रेल्वे स्थानकामध्ये नागपूरचा समावेश केला आहे. बेल्जीयमच्या टीमने नागपूर स्थानकाची पाहणीदेखील केली आहे. स्थानकांच्या विकासांसाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने आयआरएसडीसीची यंत्रणा स्थानकांचा विकास करणार असल्याची माहिती आयआरडीसीचे तज्त्र वास्तूविशारद पी.एस.उत्तरवार यांनी दिली.

नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करताना जागेचा अभावाची समस्या जाणवत होती. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या बाजूची जागा, सेना भवन, मध्यप्रदेश परिवहन महामंडळ, मॉडेल स्कूलची जागा अधिग्रहित केली आहे. ही जागा अधिग्रहित करून नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे मॉडेल तयार केले आहे. या पुनर्विकासाच्या कामात नागपुरातील स्टेक होल्डरांनी सहभागी होण्याचे आवाहन कार्य. महाव्यवस्थापक अश्विनी कुमार यांनी केले.

यावेळी आयुक्त अभिजीत बांगर बोलताना म्हणाले, नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा महत्वकांक्षी प्रकल्प असून महानगरपालिका सदैव आयआरएसडीसीच्या सोबत आहे. कुठल्याही प्रकारच्या कामांची आवश्यकता भासल्यास महापालिका रेल्वे प्रशासनासोबत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी बैठकीला तेजींदरसिंग रेणू, हेमंत गांधी, अतूल पांडे, कैलाश जोगानी, कॅप्टन चंद्रमोहन रणधीर, हेमंत नानोटी यांच्यासह मनपाच्या नगररचना विभागाचे अधिकारी व नागपुरातील स्टेकहोल्डर प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement