Published On : Thu, Oct 4th, 2018

सीसीटिव्ही कक्षात बघितली लाईव्ह चोरी

Advertisement

नागपूर: अत्याधुनिक सीसीटिव्ही कॅमेºयाच्या मदतीने अनेक चोºयांचा छडा लावण्यात आरपीएफला यश मिळाले. मात्र, या सर्व घटना चोरी झाल्यानंतरच्या आहेत. बुधवारी सकाळी आरपीएफ जवानांनी एका मोबाईल चोरास चोरी करताना सीसीटिव्ही कक्षात लाईव्ह बघितले. आरपीएफ जवान लगेच घटनास्थळी पोहोचले आणि चोरास ताब्यात घेतले. हा लाईव्ह चोरीचा प्रकार आज पहिल्यांदाच नागपूर रेल्वे स्थानकाच्या तिकीट केंद्रा जवळ (पूर्व प्रवेशव्दार) घडला.

शेख शब्बीर शेख बब्बु (३८, रा. मोमीनपुरा) असे अटकेतील मोबाईल चोराचे नाव आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास फिर्यादी संदीप क्षत्रिवासी सवायन (३९, रा. राजावती, ओडिशा) हा संत्रामार्केट अर्थात पूर्व प्रवेशव्दाराकडील रेल्वे तिकीट केंद्र परिसरात झोपला होता. ६ वाजताच्या सुमारास शेख शब्बीर घटनास्थळी गेला. त्याने परिसरात पाहणी केली तसेच फिर्यादी साखर झोपेत आहे काय याचीही चाचपणी करुन घेतली.

खात्री पटल्यानंतर त्याच्या खिशातील मोबाईल चोरला. अर्थात आरपीएफ ठाण्यातील सीसीटिव्ही केंद्रातील कर्मचारी हा सारा प्रकार लाईव्ह पहात होते. शेख शब्बीरने फिर्यादीच्या खिशातून मोबाईल काढताच आरक्षक संतोष पटेल, अर्जुन सामंतराय, दीपक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शेख शब्बीर हा लोहमार्ग पोलिस चौकी जवळ निवांतपणे दिसला. तो दुसºया चोरीच्या तयारीत असल्याचेही जवानांना समजले. पथकाने त्याची विचारपूस केली. त्याला रेल्वे स्थानकावर येण्याचे कारण विचारले. मात्र, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्याला ठाण्यात आनले.

पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक मोबाईल मिळाला. एका प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबूलीही त्याने आरपीएफला दिली. शेख शब्बीरची चौकशी सुरू असतानाच मिळालेल्या मोबाईलवर एक कॉल आला. त्याने आपले नाव संदीप सांगितले तसेच हा मोबाईल चोरी झाल्याचेही तो म्हणाला. संदीपला आरपीएफ ठाण्यात बोलावून घेतले. संदीपने आपला मोबाईल ओळखला.

खात्री पटल्यानंतर आरपीएफ निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानूसार उपनिरीक्षक बी.एस. बघेल यांनी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मोबाईलसह चोर तसेच फिर्यादीला पुढील कारवाईसाठी लोहमार्ग पोलिस ठाण्यात पाठविण्यात आले. उपरोक्त कारवाई मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.