Published On : Fri, May 2nd, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई; पाच सराईत गुन्हेगार हद्दपार

शहरात दहशतीचं वातावरण संपवण्याचा प्रयत्न
Advertisement


नागपूर – शहरात सराईत गुन्हेगारांवर लगाम घालत पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली असून, पाच गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. पोलिस उपायुक्त परिमंडळ ५ नितिन ब. कदम यांनी या गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार हद्दपारीचे आदेश दिले.

हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींनी चोरी, जबरी चोरी, अवैध दारू व गांजाची विक्री, मारहाण, महिलांवर अत्याचार व बालकांना गुन्हेगारीकडे प्रवृत्त करण्यासारखे गंभीर गुन्हे केले होते.

हद्दपार केलेले गुन्हेगार:

Gold Rate
2 May 2025
Gold 24 KT 93,700/-
Gold 22 KT 87,100/-
Silver/Kg 95,400/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

गोविंद बिवर शाह (वय ४५) – वर्धमान नगर
सोलंकी नीरज ऊर्फ बाल्या चव्हाण (वय ३१) – विशाल चौक
रजनी मनोज एकडे (वय ३८) – हड्डा वर्कशॉपजवळ
रजिया बानो मोहम्मद असलम (वय ५५) – साई नगर
सैय्यदविज्ञा ऊर्फ अनु नारके – बजाज नगर

या कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Advertisement