Published On : Fri, May 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिस दलात मोठे फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या!

महामार्ग, ट्रॅफिकसह परिमंडळात बदल
Advertisement


नागपूर : राज्य पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून नागपूर शहर पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे नागपूर पोलीस दलाच्या विविध विभागांमध्ये नवे नेतृत्व पाहायला मिळणार आहे.
नागपूर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांची बदली करण्यात आली असून आता त्यांच्याकडे नागपूर महामार्ग विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर नागपूर शहर परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांचा कार्यकाल आणखी एका वर्षासाठी वाढविण्यात आला आहे.

परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांची बदली करण्यात आली असून त्यांची यवतमाळ जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, नाशिक ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य धर्मखेलकर यांची नागपूर शहरात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महामार्ग सुरक्षा विभागात कार्यरत असलेले यशवंत सोलंके यांची बदली नागपूर शहरातील अमली पदार्थ विरोधी पथकात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

Gold Rate
June 09 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 152,700 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,43,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार सचता यांची नागपूर शहरात पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनाही नागपूर शहरात पोलीस उपायुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

या प्रशासकीय बदल्यांमुळे नागपूर पोलीस दलात नव्या रणनीतीसह कामकाजाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

भरतशेठ गोगावले को पालकमंत्री बनाने की मांग ...#latestnews #update #news

भरतशेठ गोगावले को पालकमंत्री बनाने की मांग ...#latestnews #update #news

संजय राउत बोले, नेहरू का रिकॉर्ड अतुलनीय ...#latestnews #update #news #maharashtranews #maharashtra

संजय राउत बोले, नेहरू का रिकॉर्ड अतुलनीय ...#latestnews #update #news #maharashtranews #maharashtra

माल ढुलाई की आड़ में गांजे की तस्करी का भंडाफोड़.. #nagpurnews #crime #latestnews

माल ढुलाई की आड़ में गांजे की तस्करी का भंडाफोड़.. #nagpurnews #crime...

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

नागपुर के सदर फ्लाईओवर पर तीन कारों की भिड़ंत #nagpurnews #accident #newsupdate

नागपुर के सदर फ्लाईओवर पर तीन कारों की भिड़ंत #nagpurnews #accident #newsupdate

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges