गुन्हेगारांविरोधात तातडीने कारवाई
नागपूर : गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. ९ सप्टेंबर रात्री ११ वाजल्यापासून ते १० सप्टेंबर पहाटे १ वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत ३ अधिकारी व २५ अंमलदारांचा समावेश होता. कार्यवाहीत अनेक गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवून त्यांची पडताळणी करण्यात आली.
ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी १९ संशयित गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ८ जण मिळून आले तर ११ जण हजर नव्हते. मिळून आलेल्यांमध्ये राकेश रमेश गंधेवार, रीतीक दिलीप हेमनानी, कुलदीप उर्फ कन्नू भारद्वाज, सतीष भारद्वाज, विजय हेमनानी, अनिल रमेश मंगलानी, उत्कर्ष पांडे आणि प्रणय हाडके यांचा समावेश आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपासणीदरम्यान पुढीलप्रमाणे कारवाई केली –
- कलम १४२ महापोका अंतर्गत १ गुन्हा नोंद (अपक्र. ५७५/२०२५)
- कलम ६८ मदाका अंतर्गत १ गुन्हा नोंद (अपक्र. ५७६/२०२५)
- कलम १२२ महापोका अंतर्गत १ गुन्हा नोंद (अपक्र. ५७७/२०२५)
या सर्व गुन्ह्यांची नोंदणी करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले.
नागपूर पोलिसांकडून अशा प्रकारची नियमित कारवाई सुरू ठेवून गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.