नागपूर: सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, नागपूर पोलिसांनी एक नवीन आणि महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. शहरात पहिल्यांदाच “सायबर हॅक २०२५” या स्पार्धेचे आयोजन करण्यात येत आहे. याचा उद्देश सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी नवीन आणि प्रभावी उपाययोजना करणेआहे.
या स्पर्धेत सहभागी होणारे संघ सायबर गुन्ह्यांशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी काम करतील आणि भविष्यात त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी मानके निश्चित करतील.
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी शहरातील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये या स्पर्धेची माहिती दिली.
आयडी, विदर्भ अॅडव्हान्टेज, आयआयएम नागपूर, इन्फेड आणि डेकोडॅक यांच्या सहकार्याने आयोजित केलेली हॅकेथॉन स्पर्धा ७ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयआयएम नागपूर येथे पार पडेल. याकरिता स्पर्धकांनी नोंदणी decode@procohat.com या वेबसाईटवर नोंदणी कारवी. विजेत्यांना क्रमानुसार १ लाख रुपये, ७५,००० रुपये आणि ५०,००० रुपयांची रोख बक्षिसे दिली जातील.
दरम्यान सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आयटी व्यावसायिक, खाजगी संस्था आणि सायबर तज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज पोलिस आयुक्त सिंगल यांनी अधोरेखित केली. या कार्यक्रमाला डीसीपी लोहित मतानी आणि नागपूर सायबर पोलिस टीमचे सहकार्य लाभले आहे. या लाँचिंगला उद्योगपती आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.हे नागपूर शहरात सायबर सुरक्षा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.