Published On : Sat, May 13th, 2023

नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या!

नागपूर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर घटकस्तरीय पोलीस आस्थापना मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार १२ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. या पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती बदली करण्यात येत असल्याचे कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यांच्या बदलीची ठिकाण –

Advertisement

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांची नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. प्रमोद पोरे यांची नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली आहे. देवेंद्र ठाकूर कळमना पोलीस स्टेशन, ज्ञानेश्वर भेदोडकर यशोधरा नगर पोलीस स्टेशन, विनोद पाटील तहसील पोलीस स्टेशन, किशोर नागराळे (वाहतूक शाखा),अनिरुद्ध पुरी ( वाहतूक शाखा) , भारत क्षीरसागर( विशेष शाखा), कमलाकर गड्डीमे ( जुनी कामठी पोलीस स्टेशन ), प्रशांत जुमळे (कोरडी पोलीस स्टेशन), महेंद्र आंभारे (पाचपावली पोलीस स्टेशन), गोकुल सुर्यवंशी (गुन्हे शाखा) अशी पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement