Published On : Tue, Jun 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर पोलिसातील कर्तव्यनिष्ठेला सलाम; धाडसी अंमलदाराचा पोलीस आयुक्तांकडून विशेष सन्मान

Advertisement

नागपूर : कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि मानवतेची जाणीव जपणाऱ्या अंबाझरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार यशवंत देवीसिंग पवार (बक्कल क्र. 7081) यांचा नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ₹10 हजारांचे रोख पारितोषिक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका नागरिकाला वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी यशवंत पवार यांनी दाखवलेली तत्परता आणि कर्तव्यदक्षता याची दखल घेत हा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, ते त्या दिवशी रजेवर कुटुंबासोबत असतानाही घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने जखमीचा जीव वाचण्यास मोठी मदत झाली.

यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, “खरा पोलीस तोच, जो ड्युटीवर असो वा रजेवर, संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जातो.” यशवंत पवार यांनी दाखवलेली संवेदनशीलता, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही यशवंत पवार यांच्या कार्याचे कौतुक करत, अशा कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे सांगितले. नागपूर पोलीस दलात या सन्मानाची चर्चा असून, जनसेवेच्या भावनेला दिलेली ही एक प्रेरणादायी दाद मानली जात आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.