
नागपूर : नागपूर शहर पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट,(8848.86मीटर)तसेच मकालू,(8485मीटर) मनासलू (8163मीटर)आणि लोहसे (8516मीटर) ही ८,००० मीटरपेक्षा अधिक उंचीची चार शिखरे यशस्वीरीत्या सर केली आहेत.
ही चर शिखरे सर करणारे ते देशातील एकमेव पोलीस अधिकारी आहेत या उल्लेखनीय आणि दुर्मीळ पर्वतारोहण कामगिरीबद्दल त्यांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स 2025’ मध्ये करण्यात आली आहे.
या कामगिरीबद्दल नागपूर शहर पोलिस आयुक्त मा. रवींद्र कुमार सिंगल (भा.पो.से.) पोलीस सह आयुक्त मा.नवीन चंद्र रेड्डी साहेब अप्पर पोलीस आयुक्त मा.रवींद्र सिंग परदेशी, पोलीस उपायुक्त मा.राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त मा श्री डॉ. अभिजीत पाटील सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक श्री राहुल शिरे यांनी एपीआय ननवरे यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
ननवरे यांच्या या यशामुळे महाराष्ट्र पोलिस दल आणि नागपूर पोलिसांचे नाव भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.









